पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३ जून
दि. २१ रोजी दाखल अल्पवयीन विद्यार्थींनींच्या अत्याचार प्रकरणी नराधम शिक्षकास शिक्षा व्हावी व असे निंदनीय कृत्य करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या व गुन्हाचे ठिकाण असलेल्या हॉटेल हर्षदचा परवाना रद्द करून त्याच्या मालकस या गुन्ह्यात सह आरोपी करावे यासाठी विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत निषेध व्यक्त केला.
जामखेड येथिल माध्यमिक विद्यालयीन व या गुन्ह्यातील आरोपी राधे उर्फ राधाकिसन जगन्नाथ मुरुमकर (रा. साकत) याने अल्पवयीन विद्यार्थीनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी नायब तहसीलदार गणेश भोसेकर व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनावेळी येथील सर्व धर्मीय व विविध पक्षिय नागरिकांमध्ये शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने, भिमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, पाॅलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक, माजी नगरसेवक अमित जाधव, दिगांबर चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, वसीम कुरेशी, सय्यद जमीर, उमर कुरेशी, समीर पठाण, शेख जुबेर,आर्शद शेख, अतिक शेख, वसीम सय्यद, सद्दाम तांबोळी, तौसिफ पठाण, मजहर खान, अशपाक सय्यद, अरबाज शेख आदी नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा कैलास माने, कुडंल राळेभात, विकी सदाफुले
विकी घायतडक, कॅप्टन लक्ष्मण भोरे, समीर पठाण, उमर कुरेशी, दिगांबर चव्हाण ; नय्युम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच नायब तहसीलदार गणेश भोसेकर व पोलीस निरिक्षक महेश पाटील यांहीनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
प्रतिक्रिया..
जामखेड शहरात "अश्या प्रकारांसाठी" सुरक्षित ठरणाऱ्या कॅफे चालकांना पोलीस स्टेशनला बोलावून अनावश्यक व तसे प्रकारांसाठी केलेले फर्निचर वगैरे काढून टाकून पुर्णपणे पारदर्शक दिसेल एवढेच फर्निचर ठेवण्याची सक्त ताकीद दिली असून कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई व परवाना रद्द करण्यात येतील.
पोलीस निरीक्षक महेश पाटील,
जामखेड पोलीस स्टेशन
No comments:
Post a Comment