पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१ ऑगस्ट
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वरची नागपंचमीच्या निमित्ताने यात्रा असते.गेल्या २० वर्षापासून यानिमित्ताने श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सोमवारी सकाळपासूनच येथे मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.सकाळी
जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सौ .आशा महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता श्रीनागेश्वराची विधिवत पूजा व आरती करून श्रीनागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला. दरम्यान पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजन सुरू केले. विठोबा रखुमाई भजन होताच पोलीस निरीक्षक महेश पाटील व सौ पाटील यांच्या हस्ते पालखीमध्ये मुखवटा स्थापन करण्यात आला.
पालखी सोहळा श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्ली लक्ष्मी चौक मार्गे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्रीनागेश्वर मंदिर येथे पोहोचला. कीर्तन मंडपात दिंडी पोहोचल्यानंतर संत भार पंढरीत
हा अभंग घेण्यात आला व सांगता आरती करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, सुर्यकांत मोरे, रमेश आजबे, अमित चिंतामणी, महेश निमोणकर, पवनराजे राळेभात, दिगंबर चव्हाण, गणेश डोंगरे, रमेश वराट, संजीवन मेंढकर, जयसिंग उगले, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, पांडूराजे भोसले, अमोल लोकरे आदी उपस्थित होते.
भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुर, सीताराम राळेभात, रावसाहेब कोल्हे, अश्रू कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, ईश्वर महाराज तौर, सुदाम महाराज गायकवाड, दादासाहेब महाराज सातपुते, मृदंगाचार्य स्वप्निल महाराज खोरे, हरिदास महाराज गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, शंकर माळी, शेषेराव मुरूमकर, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळे आबासाहेब महाराज वटाणे व त्यांचे विद्यार्थी व परिसरातील टाळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .कलशधारी महिला,पताकाधारी तरूण मुले यांच्या सहभागामुळे दिंडीला शोभा आली.
दिंडी मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती.शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.एकूणच संपूर्ण जामखेड शहर आज भक्तीमय झाले होते. दुपारी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांनी येथे रुद्र याग व होम हवन केले.
दरम्यान पालखी सोहळ्यानिमित्त येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सोमवारी संध्याकाळी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
मंगळवारी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये, बुधवारी २३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.
या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा