पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२२ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गेले पंधरा दिवस लाईट ये जा करण्याने नागरिक त्रस्त , गेल्या पंधरा दिवसापासून खर्ड्यातील लाईट 2, 3 तास बंदच असते , आज सकाळी १० वाजता गेलेली लाईट ५ तास होऊन पण आलेली नाही. दलित वस्ती वॉर्ड क्रंमांक एक मधील लाईटकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही. गेली १५ दिवसापासून हेच चालू आहे . यामुळे लोकांची अनेक कामे अडकून पडत आहेत. संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी फोन उचलला जात नाही. त्यामुळे
दलित वस्ती, वॉर्ड क्रंमांक एक मधील लाईटची समस्या कशी दुर होणार असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे
खर्डा शहरातील अनेक भागांमध्ये विनाकारण अर्धा अर्धा दिवस लाईट नसते. विचारपूस केल्यास वायरमन उडवाउडवीचे उत्तर देतात. यामुळे त्यांच्या मनमानी पणाला नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. लाईट येणार तरी कधी कधी आमचे खोळंबलेली काम पूर्ण होतील. असा सर्व सामान्य नागरिकांमध्ये पडलेला प्रश्न आहे. याबरोबरच खर्डा गावामध्ये फक्त राजकारणासाठीच उठाव आहे का ? राजकारणच करायचे असेल तरच वातावरण तापेल का? गावातील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार तरी कोण ? असा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.
चौकट
खर्ड्यात सुरू असलेल्या लाईटच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तरी अधिकारी किंवा कर्मचारी फोन उचलत नसल्याने आम्ही विचारपूस करायची तरी कुठे? तसेच मनमानी कारभार किती सहन करायचा असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा