पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१८ ऑगस्ट
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर तेथील गावगुंड शिंदे गटाचे आ. किशोर पाटील यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून, त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी खर्डा येथिल पत्रकारांनी आज दि .१८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खर्डा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना निवेदन देत आपला तिव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित संतोष थोरात ,किशोर दुषी, दत्तराज पवार ,आशुतोष गायकवाड ,बाळासाहेब शिंदे ,धनसिंग साळुंखे,अनिल धोत्रे , महेश बजगुडे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
समाजहितासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता जणतेचे प्रश्न भ्रष्टाचार व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर आजच्या घडीला अशा गावगुंडांकडून जिवितास धोका निर्माण झाला आहे. आणि भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील गावगुंडांकडून पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याच्या खर्डा येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आज निषेध करण्यात येत आहे. आणि सदरील गावगुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. व आमच्या पत्रकारांच्या भावना शासन दरबारी मांडाव्यात अशी मागणी उपस्थित पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा