पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१७ ऑगस्ट
एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलीस सोशल मिडीयाच्या इन्टाग्रामच्या माध्यमातून ओळख करून मी तुला लाईफटाईम संभाळेल, असे म्हणून शहरातील एका दहावीच्या अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेत व तिच्यावर अत्याचार केले प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करत अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. तर सदर अल्पवयीन मुलीस आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.
या बाबत सविस्तर असे की, दि १५ ऑगस्ट रोजी जामखेड शहरातील एक दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ही सकाळी आकरा वाजता आपल्या घरातुन बाहेर गेली ती संध्याकाळी परत आलीच नाही. त्यामुळे तीच्या आईवडिलांनी तीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्याबाबत जामखेड पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पिडीत अल्पवयीन मुलीचा अवघ्या २४ तासात शोध घेतला व पिडीत मुलीकडे चौकशी केली असता तीने सांगितल्याप्रमाणे अनिकेत सचिन घोडेस्वार रा. मिलिंदनगर याची व माझी सोशल मिडीयाच्या इन्ट्राग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी याने पिडीत मुलगी अल्पवयीन आसुन देखील तीला बीड रोडवरील एमआयडीसी च्या ग्राऊंडवर नेले व मी तुला लाईफ टाईम संभाळेल आसे म्हणून अत्याचार केला. तसेच लेन्हेवाडी गावच्या शिवारातील शेतातामधिल घरामध्ये घेऊन जाऊन तीच्यावर अत्याचार केला असा जबाबात दिला आहे.
सदर कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस काॅन्स्टेबल सचिन पिरगळ, विजय सुपेकर व सचिन देवडे यांच्या पथकाने केली आहे. सदर आरोपीस दि १७ ऑगस्ट रोजी पहाटे अटक केली असून पिडीत अल्पवयीन मुलीस आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि सुनील बडे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा