पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-७डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खर्डा येथे काल भीमसैनिक व खर्डा येथील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्तीस खर्डा येथील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे,राष्ट्रवादी चे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,मार्केट कमिटी चे संचालक वैजीनाथ पाटील,सरपंच सौ संजीवनी पाटील, ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर, इत्यादींनी विधिवत पूजा केली व त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समाजातील जेष्ठ मार्गदर्शक सिताराम जावळे यांनी पुष्पहार अर्पण केला.तसेच यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
यावेळी विजयसिंह गोलेकर यांनी बोलताना सांगितले की ,खर्डा येथे ऐतिहासिक खर्डा किल्ल्याची लढाई झाली यामध्ये शिधनाथ महार यांनी चोख कामगिरी करून त्यामध्ये त्यांना वीर मरण आले होते.तेव्हा भीमसैनिक यांनी मागणी केल्या प्रमाणे त्यांचा स्फूर्ती स्थंब उभारण्यासाठी आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करू असे आश्वासन दिले.तसेच भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रवी सुरवसे म्हणाले की जर राष्ट्रवादीने जर पाठपुरावा केला नाही तर भारतीय जनता पार्टी कडून आम्ही ते काम करू असे यावेळी त्यांनी सांगितले. सरपंच सौ. संजीवनी पाटील यांनीही डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.यावेळी भीमसैनिक व स्थानिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा