पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ डिसेंबर
खर्डा शहरातील बसस्थानक व परिसरातील बेशिस्त वाहनांना शिस्त लावावी अशी मागणी रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी , वाहनधारक व विद्यार्थ्यांमधून होत आहे
जामखेड तालुक्यातील खर्डा हे गाव.
ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेले गाव असल्याने .या खर्डा गावात जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून इथे सर्वात मोठी बाजारपेठ पेठ आहे व खर्डा शहरातून शिर्डी हैद्राबाद माहामार्ग जातो त्यामुळे या रस्त्याने येजा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असून , शाळा कॉलेज ला येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा , व एकच मेन रस्ता असल्याने नागरिकांची रहदारी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असते. त्याच पार्श्वभूमीवर खर्डा बस्थानक ते ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील बेशिस्त वाहनांना शिस्त लावावी अशी मागणी रस्त्यावरून जाणारे पादचारी, वाहनधारक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
खर्डा मेन बसस्थानक ,ग्रामपंचायत कार्यालय, शाळा कॉलेजचा एकमेव रस्ता हा बेशिस्त वाहतुकीची अड्डाच बनला असून याठिकानाहून जाणाऱ्या नागरिकांना बेशिस्त वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसते.
तसेच शाळा कॉलेजाच्या विद्यार्थ्यांचीही येजा असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे नागरिक व वाहनधारक यांच्या सोईसाठी बनवलेला हा रस्ता गैरसोईचा ठरत असल्याने या बेशिस्त वाहनाचा तातडीणे बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
चौकट
या ठिकाणी असलेले ग्रामपंचायत कार्यालय, बँक, बसस्थानक एटीएम व या परिसरातील , पोलीस स्टेशनसह विविध कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिकांनी बेशिस्त केलेल्या वाहन पार्किंगमुळे सर्व सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने या बेशिस्त वाहन पार्किंगला शिस्त लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांची या समस्येतून सुटका करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा