पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ डिसेंबर
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने राबविण्यात आलेली " शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी रक्तदान " करणे ही संकल्पनाच प्रेरणादायी आहे. एखाद्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला योग्य वेळी रक्ताचा पुरवठा झाला की, त्या व्यक्तीचे प्राण वाचते. रक्तदान करणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. अपघात प्रसंगी रक्ताचा तुटवडा जाणवतो व सर्व देशांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान उपक्रमात आपण सर्वांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. आपल्या रक्ताचा उपयोग एखाद्याला होईल व त्या व्यक्तीचा जीव वाचेल. पुढील काळातही आपण स्वतः रक्तदान करून इतरांना ही प्रेरित करावे. त्यामुळे मी स्वतः रक्तदान करून संदेश देतो की, आपणही रक्तदान करावे. असे मनोगत जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रणजित जगताप आपल्या अध्यक्षीय भाषणात केले
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ४ डिसेंबर रोजी २६/११ शहिद दिन व हुतात्मा दिना निमित्त पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन जामखेडचे न्यायाधीश रणजित जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रा मधुकर राळेभात, बाजार समिती सभापती शरद कार्ले, उपविभागीय अधिकारी सायली सोळंके, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहायक पोलीस निरीक्षक संगीता गिरी, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, सहा. फौजदार शिवाजी भोस, अँड. हर्षल डोके, बिबीशन धनवटे, रमेश आजबे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, डॉ. भगवान मुरूमकर, अंकुश ढवळे, बापूसाहेब गायकवाड, महेश निमोणकर, शामीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरात पोलीस निरीक्षक मा. श्री. महेश पाटील पोलीस कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. तसेच महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच पत्रकार, वकील, डॉक्टर, अधिकारी व विविध क्षेत्रातील तब्बल १११ रक्तदात्यांनी आपले बहुमोल रक्तदान केले. यावेळी प्रांताधिकारी सायली सोळंके, तहसीलदार योगेशजी चंद्रे, प्रा. मधुकर राळेभात, विकी भाऊ सदाफुले प्रा. विकी घायतडक, संतोष गव्हाळे, हवालदार शिवाजी कदम, पोलीस नाईक अजय साठे, हेड कॉन्स्टेबल सरोदे, पोलीस कॉन्स्टेबल बेलेकर, दिनेश गंगे, सचिन पिरगळ, संतोष कोपणर, समन्वयक स्नेहालय योगेशजी अब्दुले, डॉ. सचिन घायतडक, शामीर भाई सय्यद, पवनराजे राळेभात, जकीर शेख, बापुसाहेब गायकवाड, ॲड. एजाज पठाण, ॲड. हर्षल डोके, ॲड.,अरबाज सय्यद, ॲड. अमीर पठाण, ॲड. नितीन राजपुरे, ताहेरखान, गफ्फार पठाण, सामाजिक कार्यकर्ते नासीर चाचू सय्यद, आरीफ बागवान, मा. मुकुंद घायतडक,मुस्तफा शेख मेजर, योगेश येवले , इम्रान शेख सर, गणेश जगताप, सप्नील सदाफुले, अमित जाधव, बिलाल शेख, प्रिंस सदाफुले, किशोर कांबळे, डिगांबर राळेभात, शोएब बागवान, वाजीद पठाण, मीरा सुरेेश तंटक, लक्ष्मीबाई पवार, सुभद्रा गायकवाड, रुक्साना पठाण, निशा पवार, साधना जाधव, संगिता तोरडमल, वैशाली शिंदे, निर्मला सावंत, तसेच तालुक्यातील प्रतिष्ठीत मान्यवर अधिकारी, कर्मचारी, वकील, पत्रकार बांधव आदी बहुसंख्येने रक्तदान केले व उपस्थित होते.
रक्तदान शिबीरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदान शिबिरासाठी विषेश सहाय्य केल्या बद्दल अहमदनगर येथील जनकल्याण रक्त पेढी तर्फे जामखेडचे कार्यकुशल कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील यांचा व शामीर सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.
रक्तदान शिबीरासाठी जनकल्याण रक्त पेढीच्या कर्मचाऱ्यांनी विषेश सहकार्य केले. तर रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी पोलीस नाईक अविनाश ढेरे व पोलीस काॅन्सटेबल प्रकाश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा