पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ५ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील मोहरी गावच्या महिला सरपंच सुवर्ण हनुमत हजारे यांचे पती हनुमंत हजारे यांचा यापंचायत कारभारत कमालीचा हस्तक्षेप वाढलेला असून तसेच या माध्यमातून त्यांनी केलेला भ्रष्टाचार या विरोधात जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार अर्ज देऊनही याबाबत कोणतीही चौकशी अगर दखल घेतली जात नसल्याने जामखेड तालुक्यातील मोहरी येथील उपसरपंच हनुमान माधव बारगजे यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मोहरी गावचे उपसरपंच हनुमान माधव बारगजे (EX. BS.F), यांनी म्हटले आहे की, मी दि. १०/१०/२०२३ रोजी ग्रामपंचायत मोहरी सरपंच सौ. सुवर्ण हनुमत हजारे यांचे पती श्री हनुमंत दशरथ हजारे यांचा ग्रामपंचायत पंचायत कारभार मध्ये हस्तक्षेप आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार या विरोधात गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड तसेच तहसीलदार जामखेड, यांच्याच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर दिनांक २६/१०/२०२३ रोजी मा. जिल्हा आधिकारी मोहादय अहमदनगर येथे आणि दिनांक ३१/११/२०२३ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर येथे पुराव्यानिशी तक्रार अर्ज दिला होता. यावर आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय पातळीवर कुठलीही दखल घेतलेली नाही. मोहरीच्या सरपंच सुवर्ण हजारे यांचे पती हनुमंत हजारे व ग्रामविकास अधिकारी मोहरी ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार करत आहेत. गावात होणारी सर्व विकास कामे ही चुकीच्या पद्धतीने करत आहेत. त्याची आपण चौकशी लावावी व मी दिलेल्या तक्रार अर्जावर निर्णय येत नाही तोपर्यंत बंद ठेवावीत. यामागण्या मान्य न झाल्या दि. २०/१२/२०२३ रोजी पर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही तर मी पंचायत समिती जामखेड समोर आमरण उपोषण करत करणार आहे.
आपला विश्वास
या निवेदनाच्या प्रति नाशिक विभागाचे ग्रामविकास आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी तहसील कार्यालय , जामखेड पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा