पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ फेब्रुवारी
जगभरात तरुण तरुनाई सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत वाहून जाताना दिसत आहेत तरी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा आपल्या भविष्याकडे आणि करियरकडे लक्ष द्यावे जिद्द बाळगून त्या स्वप्नांचा पाठलाग करावा आणि आपले स्वप्न साकार करावे सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतून दूर राहावे असे प्रतिपादन खर्डा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड़ यांनी केले .
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव येथे काल दिनांक १६ फेब्रुवारी रोजी श्री. संत कैकाडी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनेगाव येथे सकाळी ११ वाजता इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता , यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व विद्यालयाचे माजी प्राचार्य राजे भोसले सर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थितीत मान्यवर यांच्या हस्ते श्री संत कैकाडी महाराजांच्या तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक श्री दत्त अण्णा बिरंगळ होते. यावेळी उपस्थितीत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचा व इतर मान्यवरांचा विद्यालयाचे प्राचार्य धनवटे सर पर्यवेक्षक कोपनर सर व उपस्थितीत सहकारी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून आलेले राजे भोसले सर यांनी वेगळेवेगळे संदर्भ देत विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले . मिळालेल्या संधीचे सोने करा असा संदेश दिला आणि शुभेच्छा दिल्या .तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मागील आठवणींना उजाळा देत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर इयत्ता दहावीच्या मुलींनी "वो दिन भी क्या दिन थे "यावर एक सुंदर परफॉर्मन्स सादर केला .
यावेळी उपस्थित खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, माजी प्राचार्य राजेभोसले सर, पंचायत समिती जामखेडचे माजी सभापती अरुण आप्पा भोसले ,सोनेगाव सरपंच डॉ. विशाल वायकर ,वंजारवाडी - तरडगावचे सरपंच डॉ. जयराम खोत, माजी सरपंच पद्माकर बिरंगळ, मेजर रावसाहेब जाधव, श्याम साठे यांच्यासह सर्व शिक्षक स्टॅफ , विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितोळे सर तर आभार सोने सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment