पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ फेब्रुवारी
जामखेड-करमाळा राज्यमार्गालगत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संरक्षण भिंती शेजारी असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या कचरा डेपो असून त्यामध्ये ओला व सुका कचरा जाळण्यात येत असल्याने धुराचे लोट परिसरात पसरत आहे याठिकाणी मेलेली जनावरे टाकली जात आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक, निमोणकर वस्ती, काळांगे वस्ती व चुंभळी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा पेटविल्यामुळे धुराच्या लोटामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध कारणांनी हा डेपो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या परीसरातील नागरीक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी लेखी तक्रार करूनही नगरपरिषद दखल घेत नाही. प्रदुषण मंडळाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.
जामखेड ग्रामपंचायत अस्तित्वात असताना जामखेड करमाळा रस्त्यालगत स्वताच्या अर्धा एकर जागेत तात्पुरता खड्डा खोदून कचरा डेपो केला आहे. या कचरा डेपोला इतरत्र हलविण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून आहे. परंतु त्याची दखल नगरपालिकेकडून घेतली जात नाही. शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता सर्व ओला व सुका कचरा तसेच मृत्यू पावलेले जनावरे तेथेच आणून टाकले जात आहे.
कचऱ्याचे विघटन वेळेवर केले जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढून तो पेटवून देण्यात येऊ लागला. मेलेली जनावरे तेथेच उघड्यावर टाकली जातात त्यामुळे दुर्गंधी व धुराचा त्रास यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली 250 विद्यार्थी, अध्यापक, आसपासच्या वस्त्या, चुंभळी व राज्यमार्गालगतच्या वळणावर सदर कचरा डेपो असल्याने व पेटविल्यानंतर धुरामुळे दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना पुढे काहीच दिसत नाही. या वळणावर अपघात होऊन यापूर्वी अनेकांचे जीव गेले आहेत.
चौकट
काशीराम गायकवाड - पर्यवेक्षक औद्योगिक प्रशिक्षण संस्था
नगरपरिषदेचा कचरा डेपो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भिंतीलगत आहे. सततचे धुराचे लोट व दुर्गंधीमुळे शिक्षण घेत असलेले 250 विद्यार्थी व अध्यापक, कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेला वारंवार तक्रारी अर्ज करूनही मुख्याधिकारी हे दखल घेत नाही . ही खंत .
चौकट
ज्ञानेश्वर मिसाळ - आरोग्य विभाग नगरपरिषद
कचरा डेपोसाठी जागेचा शोध घेतला जात आहे परंतु जागा मिळत नाही. धुराचे लोट थांबवण्यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment