पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२९ फेब्रुवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मुंगेवाडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. भाजपाचे या भागातील पदाधिकारी यांनी ही बाब लक्षात आणून देत खासदार सुजय विखे व आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यास मोठे यश आले असुन आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून नुकताच ५५ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने याभागातील लोकांचा रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आज दि. २९ फेब्रुवारी रोजी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, सरपंच संजविनी पाटील ,नानासाहेब गोपाळघरे , हरीभाऊ गोपाळघरे , नामदेव गोपाळघरे , बाळासाहेब गोपाळघरे, महेश दिंडोरे ,राजू मोरे , बाजर समिती संचालक वैजीनाथ पाटील ,भागवत सुरवसे आदी मान्यवरांसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कामाबद्दल नागरिकांनी खा. विखे आ. शिंदे व भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
खर्डा हद्दीत असलेल्या मुंगेवाडी या परिसरात सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी या भागातील भाजपा कार्यकर्त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच प्रयत्नातून हा रस्ता व्हावा अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली होती. याची दखल घेत खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांनी मुंगेवाडी रस्त्याला ५५ लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्त्यांने खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.
चौकट
नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे हे खर्डा व परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या विकास करण्यासाठी नेहमीच खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आज वाड्यांचा विकास होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर त्यांनी अल्पावधीतच राज केले आहे. बाजीराव गोपाळघरे व त्यांचे सहकारी करत असलेल्या कामांमुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला या भागातून चांगले मताधिक्य मिळेल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment