पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-९ फेब्रुवारी
पंचायत समिती येथे तालूक्याच्या शिक्षकांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठीव त्यावर तात्काळ उपाय योजना करण्यासाठी तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या समन्वय समिती ची बैठक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी सर्व प्रथम धनवे साहेब तालुक्यात आल्यापासून शैक्षणिक बदल मोठ्या प्रमाणात होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढ झाली आहे. त्याच बरोबर त्यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नही सोडविले आहेत. त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा व आभाराचा ठराव मांडण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी बैठकीत मेडीकल बील, वरिष्ठ वेतन श्रेणी, एन्. पी.एस्. रकमा जमा करणे, अर्जीत रजा मंजूरी, निवड श्रेणी , सेवा पुस्तक अदयावत करणे आदि . विषयावर चर्चा झाली . आतापर्यंत झालेल्या सर्व मिटींग मध्ये या मिटींगचे वैशिष्टे म्हणजे आजची मिटींग अतिषय खेळीमेळीच्या वातावरणात झाली . साहेबांनी वरील सर्व प्रश्नावर एक घाव दोन तुकडे या उक्ती प्रमाणे सर्व प्रश्नावर समाधानकारक पर्याय काढले व सहा शिक्षकांची टीम नेमली व सर्व्हिस बुक नोंदी, इतर काम करण्यासाठी सुचना दिल्या . शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची तळमळ पाहून शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे . यावेळी राम निकम , संतोष राऊत , नारायण राऊत, मुकंद सातपुते , किसन वराट , डमाळे, बहीर , आष्टेकर , मोरे , महिला आघाडी अध्यक्षा श्रीम. अर्चना भोसले, सुनिल महामुद्रे, तागड अदि. मान्यवर उपस्थित होते .
No comments:
Post a Comment