पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३ मार्च
जामखेड तालुक्यातील गरड पाटोदा येथे दि.३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पाटोदा गरड बसस्थानक जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे घटना घडली आहे यामुळे जामखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी आरोपीवर आर्म ऍक्टसह जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यातील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण रा. पाटोदा गरड .तालुका जामखेड हे लेबर मुकादम असून त्यांचेकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड यास आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा याने दीड वर्षांपूर्वी मारहाण केल्याने त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती त्याचाच मनात राग धरून दिनांक ३/३/२०२४ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास बस स्टँड जवळ आरोपींनी त्याच्या साथीदारांसोबत संगणमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी यातील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण(वय ४०)रा.पाटोदा ग.ता.जामखेड . उद्देशाने त्याचे वर पिस्तूलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीच्या उजव्या पायाला गोळी घालून दुखापत झाली आहे. फिर्यादी जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे , पोसई अनिल भारती यांनी घटनास्थळी भेट दिली. आबेद बाबूलाल पठाण यांच्या फिर्यादी वरून अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे व एक अनोळखी इसमाच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच घटनास्थळी तीन वापरलेले काडतुसे पोलिसांना मिळून आले आहेत. पोलीस अंमलदार अजय साठे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे करत आहेत.
चौकट
जामखेड तालुक्यात मध्यरात्री झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण पसरले आहे . खाकीचा धाक आहे की नाही ?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडला आहे.
No comments:
Post a Comment