पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-४ मार्च
राजर्षी शाहू महाराज संस्था खोंदला ता.कळंब जि.धाराशिव २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित मी ज्ञानी होणार या सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जि.प.प्रा.शाळा तेलंगशी ता.जामखेड या शाळेतील इ.सातवीची विद्यार्थीनी अमृता कल्याण चौधरी या विद्यार्थीनीने ५० पैकी ५० गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर दिक्षा तानाजी ढाळे ४३,समृद्धी राजेंद्र ढाळे ४१,संकेत बाजीराव पठारे ४१,सुमीत गोपीनाथ ढाळे ३८ व गणेश केशव जायभाय ३३ गुण घेऊन चमकदार कामगिरी केली आहे. And
२६ जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पासून ते १२ जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती पर्यंत हा उपक्रम दररोज घेण्यात आला.दररोज सामान्य ज्ञानावर आधारित पाच दर्जेदार प्रश्न देऊन प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी परीक्षा घेतली जाते.यासाठी संस्थेचे सदस्य सचिन लांडगे सर हे प्रश्ननिर्मितीचे कार्य करतात. उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वृंद्धिगत होऊन अभ्यासात सातत्य राहते व वाचनाची आवड तयार होते. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी होण्यासही मदत होते.
अमृता,सर्व गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांचे जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,विस्तारधिकारी संजय नरवडे ,सुनील जाधव ,केंद्रप्रमुख केशव गायकवाड , संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे ,सचिव गणेश नागरगोजे ,तेलंगशी सरपंच कविता ढाळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय यांच्यासह पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक आनंद राऊत ,आनंता गायकवाड,संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले,विजयकुमार रेणुके,लक्ष्मी जायभाय ,अशोक जाधव व रविंद्र धस या शिक्षकांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment