पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ मार्च
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जतमध्ये शारदाबाई पवार सभागृहात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार यांच्या हस्ते महिलांचा शारदा सन्मानाने गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये गौरी सजावट स्पर्धा, हळदी-कुंकू समारंभ, खेळ पैठणीचा, बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे, यासह विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. महिला दिनानिमित्त कर्जतमध्ये रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या २५ महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. शेती, शिक्षण, सामाजिक, व्यवसायिक, बचत गट, आरोग्य, कौटुंबिक याशिवाय इतर क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गेल्या ३ वर्षापासून हा सन्मान सोहळा घेण्यात येतो. आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या भरीव विकासकामांची माहिती यावेळी दिली. तसेच उपस्थित महिला भगिनी आणि विद्यार्थींनींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. सौ.सुनंदाताई पवार यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती सांगितली. तसेच महिला सबलीकरण,आरोग्य, शिक्षण याविषयांसंदर्भात कर्जत जामखेडमध्ये सुरू असलेल्या योजनांची माहिती देत महिलांनी स्वतःसह इतर महिलांचा सन्मान करण्याचं आवाहन यावेळी केले.
चौकट
कर्जत जामखेडमध्ये विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिला भगिनींना प्रोत्साहन देण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यापुढेही त्यांना कायम प्रोत्साहन दिलं जाईल.*
रोहित पवार
आमदार-कर्जत जामखेड
No comments:
Post a Comment