पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ मार्च
विनयभंगाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या डाॅ भास्कर मोरेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. मोरे याच्या विरोधात गेल्या आठवडाभरापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरूवारी भास्कर मोरे याला जामखेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री रत्नदीपचा संस्थापक डाॅ भास्कर मोरे याला इंदापूर तालुक्यातील भिगवन येथून अटक करण्याची कारवाई केली होती. भिगवन येथील एका ऊसाच्या शेतात मोरे हा लपून बसला होता. त्याला तेथून अटक करण्यात आली होती. मोरे याला पोलिसांनी अटक करताच अंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केला होता.गुरूवारी पहाटे एलसीबीने भास्कर मोरे याला जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच त्यानंतर जामखेड पोलिसांनी भास्कर मोरे याला गुरूवारी दुपारी न्यायालयात हजर केले. जामखेड न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. वनविभागाच्या गुन्ह्यातही मोरे याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
चौकट
जामखेड पोलीस स्टेशनचे एक पथक पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आले यावेळी पोलीस हवालदार प्रवीण इंगळे, डि बी पथक पो. हवालदार हृदये घोडके, पोलीस कॉन्स्टेबल देवा पळसे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे, दक्षिण विभाग चे मोबाईल सेल चे पोलीस काँ.राहुल गुडु या पथकाने कामगिरी पार पाडली
No comments:
Post a Comment