पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१५ मार्च
जलसंपदा विभागाच्या राज्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करणे आणि पुर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने नाबार्डकडून दिर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.या शासन निर्णयामुळे कर्जतमधील कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली. जलसंधारण मंत्री असताना आमदार प्रा राम शिंदे यांनी कुकडी प्रकल्पासाठी 4 हजार कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. 18 सप्टेंबर 2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन फडणवीस सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. या मान्यतेमुळे कुकडी डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अवर्षण प्रवण भागाला सिंचनाचा मोठा फायदा झाला आहे.आता आमदार प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून कुकडी प्रकल्पासाठी पुन्हा एकदा 249 कोटी रूपये नाबार्डच्या माध्यमांतून उपलब्ध होणार आहेत. या निधीमुळे कर्जतमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांना पाणीदार आमदार का म्हणतात याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जनतेला आला आहे. जलसंपदा विभागाच्या राज्यातील 75 अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करणे आणि 155 पुर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी 15 हजार कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने 7 हजार 500 कोटींचे कर्ज नाबार्डकडून दिर्घ मुदतीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कुकडी प्रकल्पासाठी 249 रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून कर्जत तालुक्यातील कामे मार्गी लागणार आहेत. कृष्णा खोर्यातील कुकडी सिंचन प्रकल्पात कर्जत तालुक्याचा समावेश होतो. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे कर्जत तालुक्याला शेतीसा
No comments:
Post a Comment