पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१५ मार्च
जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारातील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या सर्व काॅलेजच्या मान्यता रद्द करणे, सर्व विद्यापीठाचे नोडल अधिकारी नियुक्त करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्या सर्व स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येतील अश्या प्रकारे प्रशासना मार्फत मिळालेल्या आश्वासनानंतर गेली ११ दिवस विद्यार्थ्यांचे सुरू असलेले अंदोलनास पाठींबा म्हणून ९ दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुरंग भोसलेंना सुरू केलेले अमरण उपोषण आज दि. १५ मार्च रोजी सायंकाळी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन स्थगित करण्यात आले.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व अर्थिक पिळवणूक करत असलेल्या कारणावरून दि. ५ मार्च रोजी काॅलेजच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यी मिळून २६८ जणांनी केलेले अंदोलनास पाठींबा म्हणून पांडुरंग भोसले यांनी दि. ७ रोजी अमरण उपोषण सुरू केल्याने अंदोलनाची तिव्रता वाढली. त्यामुळे दरम्यानच्या काळात विविध पक्षसंघटनांनी दिलेला पाठिंबा, आमदार रोहीत पवार व आमदार राम शिंदे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व विद्यापीठे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठपुरावा करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची घेतलेली भूमिका या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने तसेच मेडिकल कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर दाखल विनयभंगाच्या गुन्हात त्याला अटक केल्याने आज दि. १५ मार्च रोजी पारनेरचे आ. निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन हे अंदोलन स्थगित करण्यात आले.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आ. निलेश लंके हे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरकडे जात असताना जामखेड शहरातील खर्डा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. त्यावेळी त्यांना अंदोलनाबाबत त्यांना पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांनी अंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच आमदार रोहीत पवार यांनीही दुरध्वनी वरून झालेल्या सर्व कारवाई व कार्यवाही याबाबत माहिती दिली व अंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आज ११ व्या दिवशी हे अंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार सचिन माळी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, प्रदिप टापरे, राजेंद्र कोठारी, रमेश आजबे, शहाजी राळेभात, डॉ. भगवान मुरूमकर, पवन राळेभात, हवा सरनोबत संजय कोठारी, आदी मान्यवरांसह पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या भागातील दोन्ही आमदार यांनी प्रशासनाकडे व शासनाकडे पाठपुरावा केलेलाच आहे. मी ही काही वेळातच विद्यापीठ प्रशासन, संबंधित मंत्री महोदय यांना माझे पत्र देत आहे. जर सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर झाल्या नाहीत तर पुढील अंदोलन नगर येथे करू त्या अंदोलनाची जबाबदारी माझी राहील. विद्यार्थ्यांनी केलेल्या या अंदोलनास पाठींबा देण्यासाठी पांडुरंग भोसले यांनी अंदोलन केले व अंदोलनास यश आले. माझेही तसेच काम आहे. मीही हाती घेतलेले कोणतेही कार्य पुर्ण केल्याशिवाय राहात नाही. या अंदोलनास पाठींबा दिल्याबद्दल पांडुरंग भोसलेंसह विविध पक्षसंघटना व जामखेड परिसरातील नागरिकांचे आभार मानले. तसेच ज्या-ज्या वेळी तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही मदतीची गरज असेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी नाही तर दोन पावलं तुमच्या पुढे असेल, तसेच मंत्री महोदय किंवा विद्यापीठा समोर जरी अंदोलन करण्याची वेळ आली तरी मी तुमच्यासोबत असेल असेही आश्वासन आ. लंके यांनी विद्यार्थी व पांडुराजे भोसले यांना दिले.
No comments:
Post a Comment