पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/2एप्रिल
अहिल्यानगर /नगर दक्षिण मतदार संघात उमेदवारी जाहीर झालेले भाजपा महायुती व मित्र पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबद्दल असलेली सर्व नाराजी दुर झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. सुजय विखेंना मागील निवडणूकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी केला असल्याची माहिती आमदार प्रा.राम शिंदे व खा. सुजय विखे यांनी जामखेड येथे आयोजित पत्रकार परिषद दिली.
लोकसभा निवडणुक जाहिर झाल्यानंतर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे तसेच आपला विधानसभा निवडणुकीत पराभव होण्यास विखे हेच कारणीभूत असल्याचे म्हणत त्यांच्या उमेदवारीस आमदार राम शिंदे यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आ. शिंदे व विखे पितापुत्रांमध्ये समेट झाला होता. मात्र जामखेड तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते अजूनही नाराज असल्याचे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आज दि. २ एप्रिल रोजी जामखेड येथे आ. राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्याची बैठक पार पडली. साधारण तीन तास चाललेल्या बैठकीत कार्यकर्त्याची नाराजी संपली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा खासदार करण्यासाठी मागील वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असल्याचे आ. राम शिंदे व खा. सुजय विखे यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खा. सुजय विखे म्हणाले की, मधल्या काळात कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर
आज झालेल्या बैठकीत आ. राम शिंदे व स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्याबाबत त्यांना सकारात्मक उत्तरं मिळाली. पक्षातील नाराजी हा आमचा कौटुंबिक विषय होता. भाजपा म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांचे कुटुंब आहे. त्यामुळे एक भावकीचा विषय म्हणून आम्ही तो मिटवून घेतला. एक खासदार म्हणून संघटनेतील नाराजी करण्याचे माझे काम आहे. जामखेड तालुका हा भाजपा महायुती म्हणून एकत्र राहणार असून महायुतीचा खासदार कसा निवडून येणार किंवा मताधिक्य कसे देणार यासाठी सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वजण कामाला लागले आहेत. यावेळी आ. प्रा.राम शिंदे म्हणाले की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून खा. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात त्यांचे दौरे सुरू आहेत. त्याच अनुषंगाने आज जामखेड येथे प्रचार नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी मागील पाच वर्षांच्या कालावधीत आलेले अनुभव व त्या संदर्भात आपली असलेली नाराजी व्यक्त केली. यावर खा. सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतली व त्यावर समाधान कारक उत्तरे देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. याबैठकीत खा. सुजय विखे व कार्यकर्त्यांचा समन्वयक झाल्याने आता नाराजी दुर झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना मागील वेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असल्याचे आ. राम शिंदे यांनी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, डॉ. भगवान मुरूमकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, बापूसाहेब ढवळे, शहराध्यक्ष पवन राळेभात, लहु शिंदे, सोमनाथ पाचरणे, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया आदि पदाधिकारीही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment