पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/2एप्रिल
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईतून दिलासा मिळावा यासाठी भीमा नदीतून सोडण्यात आलेले पाणी औटेवाडीपर्यंत सोडणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची आज (मंगळवार) पुण्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले.
कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहितदादा पवार यांनी कालवा समितीच्या बैठकीत भिमा नदीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांसाठी भामा आसखेड धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.. मात्र हे पाणी कर्जत तालुक्यातील औटेवाडीला पोहोचेपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी आज कर्जतमधील शेतकऱ्यांनी पुण्यात सिंचन भवनात जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. गुनाले साहेब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली.
कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची समस्या निर्माण झालीय. आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भिमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही मागणी मान्य करत अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भामा आसखेड धरणातून भीमा नदीपात्रात सध्या पाणी सोडण्यात आले आहे.. मात्र हे पाणी कर्जत तालुक्यातील औटेवाडी गावापर्यंत पोहोचेपर्यंत सुरू ठेवावे, या मागणीसाठी आज कर्जतमधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी पुण्यात सिंचन भवनात जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भिमा नदीतून जर पाणी सोडले तर कर्जत तालुक्यातील गावांना पाणी मिळेल आणि पाणी टंचाईच्या परिस्थितीतून नागरिकांना दिलासा मिळेल. त्यानुसार भामा आसखेड धरणातून भिमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईतून दिलासा मिळणार आहे. पण सगळ्या गावाची पाणी टंचाईच्या परिस्थितीतून सुटका व्हावी म्हणून हे पाणी औटीवाडी गावापर्यंत यायला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ही मागणी अधिकाऱ्यांनी मान्य केली.
-----------..
चौकट
"माझ्या मतदारसंघात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची कालवा समितीच्या बैठकीत केलेली मागणी मान्य झाली आणि सध्या हे पाणी सुरु आहे. परंतु हे पाणी औटेवाडीपर्यंत आलं पाहीजे, असा माझा आग्रह होता. याबाबतच आज कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनीही अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि अधिकाऱ्यांनी ती मान्य केली. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही काळजी करू नये."
आमदार रोहित पवार (कर्जत-जामखेड)
No comments:
Post a Comment