पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/4 एप्रिल
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील जल जीवन मिशन अंतर्गत शासन नियमाप्रमाणे ज्या ठिकाणाहून या योजनेचा पाणीपुरवठा होणार आहे तेथील उद्भवाचे काम करावे व तेथे पाणी उपलब्ध झाल्यानंतरच पुढील पाईपलाईनचे काम करावे. मात्र असे असताना या योजनेच्या कामाचा ठेका मिळालेले ठेकेदारने त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी थेट पाईप लाईनचे काम चालू केले आहे. जर तेलंगशी येथील या कामाच्या नियोजित जलस्रोत (विहीर) च्या ठिकाणी पाणी लागले नाही तर पाईपलाईनसाठी केलेला सर्व खर्च वजा जाईल.व यातून फक्त ठेकेदाराच फायदा होईल. व गाव योजनेच्या लाभापासून वंचित राहील. त्यामुळे हे काम करताना सर्वात पहिले नियोजित उद्भव असलेल्या विहीरीचे काम करावे. आणि जर विहिरीला पाणी लागले तरच पुढील पाईपलाईन व ईतर कामे करावीत अशी मागणी तेलंगशी येथील युवक ऋषिकेश अशोक नेहरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता यांना सविस्तर तक्रार अर्ज दिला आहे.
यावेळी विशाल वायभासे, संदीप केकान, शहादेव जायभाय, पिंटू जायभाय, ज्ञानेश्वर जायभाय, एकनाथ जायभाय, जयराम जायभाय हे युवक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम मंजूर असून सदर कामाची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेले आहे. असे असताना सदर कामाचे ठेकेदार यांनी दि ०२/०४/२०२४ पर्यंत म्हणजे साधारण दिड वर्ष जाणून- बुजून हे काम करण्यास टाळाटाळ केलेली आहे. यानंतरही सदर ठेकेदाराने शासन नियमाप्रमाणे उद्भव ओत (विहीर) अगोदर करने आवश्यक आहे. सदरचे ठेकेदाराने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी दि. ०२/०४/२०२४ मंगळवार रोजी पाईप लाईनचे काम चालू केलेले आहे. तरी हे पाईप लाईनचे काम तात्काळ बंद करून सदर योजनेच्या पाण्याचा उद्भव असलेल्या विहीरीचे काम अगोदर करण्यात यावे. आणि जर सदर विहिरीस पाणी लागले तरच पुढील योजनेचा पैसा खर्च करावा अन्यथा पर्यायी उद्धव स्त्रोत (विहीर) पहावा व अन्यथा या योजनेचा निधी वाया जाईल व गाव पाण्यापासून वंचित राहिल. तरी याबाबत तात्काळ कार्यवाही करून अगोदर विहिरीचे काम करावे व नंतर पाईपलाईनचे अशा सुचना सदर ठेकेदारास द्याव्यात अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने अंदोलन केले जाऊ शकते असा इशारा तेलंगशी येथील युवक ऋषिकेश अशोक नेहरकर यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती उपअभियंता पंचायत समिती, जामखेड यांचे सह विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment