पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/११ जुलै
जामखेड येथे येत्या रविवारी दि. 14 जुलै रोजी अहमदनगर जिल्हा कॅडेट, ज्युनियर व सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशन च्या वतीने दरवर्षी सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनियर व सिनिअर अशा चार वेगवेगळ्या जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येतात यावर्षी कॅडेट, ज्युनियर व सिनिअर
या तिनही गटातील मुले व मुलींच्या एकत्रित जिल्हा स्पर्धा जामखेड येथे घेण्यात येणार आहेत. व त्यानंतर थोड्याच दिवसांत सब ज्युनिअर जिल्हा स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
व यातून प्रत्येक वजन गटातून विजेता खेळाडू राज्य स्तरावर अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (मुंबई) मान्यतेने महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा, चंद्रपूर येथे दिनांक 19 ते 21 जुलै 2024 दरम्यान होणार आहे तर महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा, बीड येथे दिनांक 25 ते 27 जुलै 2024 दरम्यान होणार आहेत. जामखेड येथे होणाऱ्या स्पर्धेतील विजेते खेळाडू बीड व चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होतील. असे श्री. बारगजे यांनी सांगितले.
जामखेड येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय कर्जत रोड येथे सकाळी नऊ वाजल्यापासून या स्पर्धा सुरू होतील. भारतीय तायक्वांदो महासंघाच्या ( टीएफआय) नियमानुसार होतील. तरी जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंढे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment