पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२१ जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण येथे चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात खर्डा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी आरोपी विश्वजीत सिद्धेश्वर पवार वय(२६) रा. देवदैठण ता. जामखेड यास अटक करून त्याच्याकडून दोन तोळे सोने व वीस हजार रुपये असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 2 जुलै 2024 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवदैठण येथील भगवंत त्रिंबक भोरे यांच्या दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सामानाची उचका पाचक करून 20 ग्रॅम सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद, कॉन्स्टेबल प्रवीण थोरात, गणेश बडे, धनराज बिराजदार यांनी मोठ्या शिताफीने तपास करून या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात यश मिळवले. आरोपी विश्वजीत सिद्धेश्वर पवार वय (26 )राहणार देवदैठण तालुका जामखेड यास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेला ऐवज दोन तोळे सोने व वीस हजार रुपये असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण थोरात, गणेश बडे, धनराज बिराजदार, यांच्या पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment