पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/७ जुलै
बांधकाम विभागामार्फत बांधकाम मजुरांसाठी विविध योजना चालविण्यात येतात. बांधकाम मजूर म्हणून ९० दिवस काम केलेचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र नोंदणी करणेकामी ग्राहय धरण्यात येते व या प्रमाणपत्राचे आधारे बांधकाम मजुर म्हणुन नोंदणी केली जाते. वरील प्रकारची नोंदणी प्रक्रिया राबवत असताना, ग्रामसेवक यांनी सदर कामगार हा कोणत्या नोंदणी कृत कंत्राटदाराकडे काम करतो त्याचा परवाना आहे का, ९० दिवस काम केल्याबाबत दिनांकानुसार हजेरीपटावर कत्राटदाराची स्वाक्षरी, ज्या कामगाराच्या खात्यावर ठेकेदाराने पैसे जमा केले असल्यास बँक स्टेटमेंट किंवा नगद पैसे दिले असल्यास त्यांचे ठेकदाराचे प्रमाणपत्र ,कामगाराने कोणत्या कामावर काम केले, त्या कामाचे नाव व वर्क ऑर्डर, कामगाराचा मजूर म्हणून ठेकेदाराने विमा उतरवला आहे किंवा कसा या बाबीची पडताळणी न करता बोगस बांधकाम मजुरांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक काही दलालांता बळी पडून देत आहेत. तरी सदर बाबीची तपासणी करुन योग्य बांधकाम मजुरांना न्याय दयावा व असे बोगस प्रमाणपत्र देणा-या ग्रामसेवकांवर कारवाई करावी असे निवेदन मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment