पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/७जुलै
गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत.
त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
मागील चार दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव, बेलवंडी कोठार, आढळगाव, टाकळी परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हे ड्रोन आकाशात रात्री आठ ते दोन वाजेपर्यंत गेल्या चार दिवसांपासून घिरट्या घालत आहेत.
त्यामुळे या भागातील नागरिकांत प्रचंड घबराट पसरली असून अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन जनतेचे प्रबोधन करून त्यांच्यातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.घुगलवडगाव येथील बाबुराव दांगडे व आबासाहेब लोखंडे यांनी रात्री अकरा वाजेदरम्यान एक ड्रोनसदृश उपकरण पाहिल्याची माहिती दिली. तसेच, महिला बचतगटाचे अध्यक्षा उषा लोखंडे यांनी सांगितले की गुरुवारी व शुक्रवारी रात्री दहा वाजता ड्रोन आकाशात घिरट्या घालताना दिसले.
गावातील काही नागरिकांनीही रात्रीच्या वेळी ड्रोन आकाशामध्ये पाहिले. रात्रीच्या वेळी ड्रोन कोठून येते आणि कुठून जाते, हे नागरिकांना अद्याप कळलेले नाही. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गावातील नागरिकांमध्ये या ड्रोनची जोरदार चर्चा चालू आहे. याबाबत लोकांमध्ये वातावरण शासकीय निर्माण झाले भीतीचे असून, अधिकाऱ्यांनी तात्काळ काळजी घेऊन जनतेच्या मनातील भीती नाहीशी होण्यासाठी प्रयत्न करावेत.
घराच्या काही अंतरावर ड्रोनसदृश उपकरण घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत, हे ड्रोन काही सर्वे करतात की ड्रोनद्वारे चोरटे टेहळणी करून चोरी करीत आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. सध्या या ड्रोनची चर्चा अनेक गावांमध्ये व सोशल मीडियावर सुरू आहे.
No comments:
Post a Comment