पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील बहुचर्चित प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीस दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी शुक्रवारी पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे ,गणेश भागडे,भोरे यांनी श्रीगोंदा न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आजोबाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या संशयावरून जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील दत्तमंदिरातील पुजारी कुशाबा शिकारे यांच्यावर चाकूने वार करत ठार मारल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी आरोपी शंकर सोपान शिकारे, (वय ३२), याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी भा.दं.वि. ३०२, अन्वये दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नेमका हा प्रकार काय घडला होता ते पाहू.
घटनेची हकीगत की जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती, वरील दत्तमंदिरातील पुजारी कुशाबा तुळशीराम शिकारे हे भजन, कीर्तनाचे कार्य करत होते. दि.२ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास मंदिरामध्ये भजनाची तयाची करत असताना
आरोपी शंकर सोपान शिकारे याने कुशाबा शिकारे यांच्यावर चाकूने चेहऱ्यावर, मानेवर, हातावर वार करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी कुशाबा शिकारे यांना त्याच्या मुलाने उपचाराकामी खर्डा येथे दवाखान्यात नेले.
डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मयताची पत्नी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द भा.दं.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला.
पोलीस निरीक्षक पाडुरंग पवार यांनी संपूर्ण तपास करून मा. न्यायालयात देषारोपपत्र पाठवले. तपासादरम्यान आरोपीच्या आजोबांनी आत्महत्या केली होती. मयत कुशाबा शिकारे हे त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या संशयावरून आरोपी याने कुशाबा शिकारे यांचा खून केला.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश-१ मुजीब. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, स्वतंत्र साक्षीदार,
वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके) तसेच संगीता ए. ढगे यांनी काम पाहिले.
सदर कामगिरीमध्ये पोलिस नाईक गणेश गाडे, बाबासाहेब बडे, मनोज साखरे कोर्ट पैरवी रोहकले यांनी मदत केली.
न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. ३०२, अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
No comments:
Post a Comment