पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७सप्टेंबर
लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी आता आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडे वळवला आहे. जिल्हयातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत अहमनगरच्या जनतेने सुजय विखेंचा पराभव करत निलेश लंके यांना खासदार म्हणून निवडून दिले.
यानंतर आता माजी खासदार सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवल्याने अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरात विरूध्द सुजय विखे लढत होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात हे संगमनेरचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी विखे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू मला संगमनेरमधूनच विधानसभा निवडणूक लढायला आवडेल इतर मतदारसंघात नको. पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधूनच उमेदवारी करणार आहे असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता संगमनेर विधानसभा मतदारसंघात थोरात विरूध्द विखे सामना रंगणार का ? अशा राजकीय चर्चांना जोर आला आहे.
No comments:
Post a Comment