पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१५ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव येथील सिंचन पंप चोरी करणाऱ्या टोळीतील राजेंद्र बाळू ससाने व ऋषिकेश बाबासाहेब जाधव दोघेही राहणार नायगाव या दोन चोरट्यांना मुद्दे मला सह अटक करण्यात आले आहे चार मोटरी सिंचन पंप व मोटरसायकल असा एकूण 38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल खर्डा पोलिसांना जप्त करण्यास यश आले आहे
गेले अनेक दिवसांपासून तालुक्यातील नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटर चोरी जात होत्या त्यामुळे शेतकरी हायरम झाले होते मोटरी चोरणारे टोळीकडून अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येत होता खरडा पोलीस स्टेशन हद्दीत शेतकर्यांच्या शेतातील पाणी उपसा करण्यासाठी वापरता येणाऱ्या सिंचन पंपाची चोरी झाले बाबत तक्रार झाल्याने गु.रं.नं 134/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) ,3 (5) माने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदिप धामणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण थोरात, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे, असे करत असताना पोलीस कॉन्स्टेबल प्रविण थोरात यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली यानुसार तपासाची चक्रे फिरवली व आरोपीचा तपास लावला. सदर बातमीच्या अनुशंगाने नमुद आरोपींचा शोध घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन तपास केला असता, त्यांनी सदर गुन्हयाची कबुली देवुन दाखल गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपींकडून ४ सिचन पंप (मोटारी) व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकुण ३८,००० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस अंमलदार संदिप धामणे, संभाजी शेंडे, प्रविण थोरात, गणेश बडे, शशिकांत म्हस्के, आनंद धनवडे, धनराज बिराजदार, गोविंद दराडे यांच्या पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment