पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील नान्नजला " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर" नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालयास तालुकास्तरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानातंर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील "श्री नंदादेवी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, नान्नज" या विद्यालयास तालुका स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
या विद्यालयाचा गौरव अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या आपल्या संस्थेच्या विजयादशमी उत्सव तथा दसरा मेळावा समारंभामध्ये करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रा.ह.दरे साहेब उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव-विधीज्ञ विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव-जयंत वाघ साहेब,खजिनदार-दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, ज्येष्ठ विश्वस्त-जी.डी. खानदेशे साहेब , सन्माननीय सीताराम पाटील खिलारी साहेब , सन्माननीय मुकेश दादा मुळे, संस्थेचे सन्माननीय सदस्य, पदाधिकारी तसेच रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्ही.के. पोकळे सर, न्यू आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरचे प्राचार्य डॉ. सागडे सर आदींच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
या गौरवप्रसंगी सन्मान स्वीकारताना विद्यालयाचे प्राचार्य डॉ .रामदास टेकाळे, श्री. संतोष मस्के सर, श्री. दादासाहेब पाटील सर, श्री.राजेश महारनवर सर, श्री. अनुभुले सर, श्री. साबळे सर, श्री.बनकर सर, श्री. ढास सर, श्री.शिंदे सर, श्री. सातपुते सर, श्री. बोराडे सर,श्री. गाडे सर, श्री जाधव सर,प्रा. काळे सर,प्रा. दत्ता मोहोळकर सर,श्री. ठाकरे सर, श्री. शेख सर, विद्यालयाचे लेखनिक श्री. पानमळकर भाऊसाहेब, श्री. अशोक मोहोळकर सर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी श्री नंदादेवी विद्यालयास मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment