पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१८नोव्हेंबर
राज्यात येत्या वीस तारखेला होत असलेल्या मतदानासाठी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने आर्ट ऑफ लिविंग खर्डा शाखेच्या वतीने शहरात मतदार जागृती अभियान राबविण्यात आली बस स्थानक परिसरातून निघालेल्या जनजागृती रॅली सुर्वे गल्ली, शिंपी गल्ली, मेन रोड, रविवार पेठ येथून हातात बॅनर घेतलेले आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे सह श्री छत्रपती जुनियर कॉलेज खर्डा, संत गजानन महाविद्यालय ,केमिस्ट असोशियन खर्डा याही संघटना यावेळी आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या मतदार जागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये हातामध्ये मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, सोडा सर्व काम चला करूया मतदान, माजे मत माजे भविष्य, एका मताचे सामर्थ्य लोकशाहीचे अभेद कवच, जागरूक मतदार मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा ,मतदान हा अधिकार नाही तर कर्तव्य असे विविध मतदार जागृती व्हावी, जागृत मतदार लोकशाहीचा आधार असे विविध बॅनर फलक हातात घेऊन मतदार जनजागृती आर्ट ऑफ लिविंग परिवार खर्डा, खर्डा केमिस्ट असोसिएशन, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, संत गजानन महाविद्यालय यासह सामाजिक कार्यकर्ते मतदार जागृती मध्ये सहभागी झाले होते.१००% मतदान करा व मतदानाला सर्वांनी जावा, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, देशाच्या प्रगतीला हातभार लावा असेही आव्हान यावेळी करण्यात आले.
या मतदार जागृती रॅलीमध्ये आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक संतोष थोरात, रवींद्र कुलकर्णी, गणेश जोगदंड ,नितीन राळेभात, बबन नाईक,काव्या राळेभात, महेश लोंढे ,कल्याण सुरवसे, क्षितिज जोगदंड, जयदीप पाटील,आदित्य थोरात, वैशाली थोरात, आशा थोरात ,सुनिता थोरात यांच्यासह आर्ट ऑफ लिंक परिवाराचे सदस्य, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कदम ,पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खाडे, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ मिसाळ ,केमिस्ट असोसिएशनचे किरण वाघमारे, बालाजी होडशीळ, किशोर गाताडे, अशोक हराळ, संतोष थोरात, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण घोडके, प्रा. धनंजय जवळेकर, प्रा श्रीकांत तनपुरे, प्रा किरण खेडकर, श्री संत गजानन महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकिशोर बारटक्के, प्रा डॉ भारत मेंगडे, प्रा आजिनाथ खेडकर यासह सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment