पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/७नोव्हेंबर
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी खर्डा, ता. जामखेड येथील एकाला श्रीगोंदा येथील जिल्हा व अति सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबतची माहिती अशी की,
सदर प्रकरणातील महिलेचे आरोपी सोबत अनैतिक संबंध होते. ही बाब मयत विशाल सर्वेच्या लक्षात आली. त्याने त्याच्या पत्नीला व आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मयत हा प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याचे लक्षात येताच आरोपीने दि.१३ मे२०२२ रोजी मध्यरात्री मयताचा निघृण खून केला.
याबाबत मताचा भाऊ सुशांत सुर्वे याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जामखेड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. तपासादरम्यान
मयताच्या पत्नीचे आरोपी सोबत प्रेमसंबंध
असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच आरोपी व मयताची पत्नी यांच्या दरम्यान असलेल्या प्रेम संबंधाला मयत अडथळा करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोपीने मयताचा अडथळा दूर करण्याच्या हेतूने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण एकवीस साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील काही साक्षीदार फुटीर झाले; परंतु फिर्यादी सुशांत सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पंच सुरेश पवार, प्रकाश गोलेकर, गोरख शिकारे, सुरेश हजारे, पवन सोनवणे, श्रीराम कुलकर्णी, हनुमंत औटी, योगेश वाळुंजकर, डॉ. संजय वाघ, साक्षीदार राजेंद्र भुमकर, तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या साक्षी
महत्त्वपूर्ण, परिस्थितीजन्य व ग्राह्य धरण्यात आल्या.
आलेल्या साक्षीदारांनी दिलेले पुरावे, दाखल कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपीविरुद्ध गुन्हा शाबित करण्याकामी सबळ व पुरेशी असल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने तसेच सरकार पक्षातर्फे तपासण्यात
आरोपीने पुरावा नष्ट केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व अति सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ व २०१ नुसार दोषी धरून आरोपीला जन्मठेप तसेच १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षास पैरवी पोलीस हेडकोन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ, कर्मचारी दत्तात्रय शिरसाठ, पोकॉ. नामदेव रोहाकले, मपोकॉ. श्रीमती आशा खामकर, मपोकॉ. श्रीमती सुजाता गायकवाड व ॲड . सुमित पाटील यांनी मदत केली.
No comments:
Post a Comment