पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/६नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भर दिवाळीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना खर्डा येथील सिताराम गड येथे घडले आहे
सीताराम गडाच्या मागील बाजूला गडाचे बांधकाम चालू आहे व ट्रक त्या रस्त्याला जात असतानाच ३३ के.व्ही.च्या तारेला ट्रकचा स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि ५ नोव्हेंबर २०२४ रोजी जामखेड तालुक्यातील सीताराम गड परिसरात घडली आहे. मयत राम मच्छिंद्र निंबाळकर (वय ४०) राहणार दुरगाव तालुका कर्जत असे मृत चालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मृत यवूक राम मच्छिंद्र निंबाळकर ट्रक नंबर (एम एच १२ के.आर. २७५१) या ट्रक मध्ये कर्जत तालुक्यातील दुरगाव येथून विटा भरून खर्डा येथील सीताराम गड येथे जात असताना हाय टेन्शन इलेक्ट्रॉनिक तारेला स्पर्श होऊन , हाय टेन्शन तार खूप उंचीवर नसल्याने ट्रकमध्ये तारेचा करंट उतरून ट्रकचे मागील दोन टायर फुटून मयत झाला आहे .या ट्रकमध्ये विटा भरून जात असताना वरून गेलेल्या ३३ के.व्ही.च्या विजेच्या तारेला ट्रकचा वायरला स्पर्श होताच ट्रकचे टायर फुटले, टायर फुटल्याच्या आवाजाने नागरिकांनी ट्रककडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत मयत राम मच्छिंद्र निंबाळकर
यांचा मृत्यू झाला होता.सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
चौकट
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर यांनी महावितरण अधिकारी कदम यांच्या महावितरणाच्या गलथान कारभार असल्याचे सांगितले ते म्हणाले हाय टेन्शन तार ३३के.व्ही.खूप उंचीवर नसल्याने ट्रकमध्ये तारेचा करंट उतरून ट्रकचे मागील दोन टायर फुटून तरुणाचा मृत्यू झाला आहे आणखीन अशा घटना ह्या परिसरात घडू नयेत याकरिता महावितरण अधिकारी यांनी लवकरात लवकर हाय टेन्शन मेन तारेची उंची वाढवावी असे पोलीस वारंट न्यूज नेटवर्कशी बोलताना त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment