पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३० डिसेंबर
बीड जिल्ह्यातील मस्साजोर या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. सीआयडीने सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
याहत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. यामुळे आता तपास यंत्रणेने वाल्मिक कराड याचा शोध सुरू केला आहे. पण, कराड याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले आहे.वाल्मिक कराड याचा १३ डिसेंबर पर्यंत फोन सुरुच होता. पण यानंतर कराड याचा फोन बंद झाला. ११ डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशमधील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पोलिस अंगरक्षकही दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोर येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. कराड याच्या सांगण्यावरुन हत्या केल्याचा आरोप होत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येला २१ दिवस उलटून गेले पण अजूनही काही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. दरम्यान, आता या आरोपींना पकडण्यासाठी सर्व पक्षांकडून दबाव वाढला आहे. काही दिवसापूर्वी बीडमध्ये आक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
सीआयडीने आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी वाल्मिक कराड याची चारही बाजूंनी कोंडी केली आहे. यामुळे आता कराड पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment