पोलीस वारंट न्यूज नेटवर्क२ जानेवारी२०२५
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने दि २ जानेवारी रोजी गुरुवारी खर्डा पोलीस स्टेशनच्यानर रेझिंग डे साजरा केला आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तास ऑन ड्यूटी असणा-या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी, यासाठी ‘खर्डा पोलीस पोलिस स्टेशनला’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी दि.२ जानेवारी रोजी खर्डा येथील खर्डा इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला निमंत्रित करून पोलिस खात्याच्या कामकाजाविषयी माहिती दिली आहे.
त्याचबरोबर पोलिसांकडील शस्त्रसाठ्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले .विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत माहीती दिली.महाविदयालयातील विद्यार्थ्यांना व खर्डा ग्रामस्थांना कायदया विषयी माहीती सांगीतली तसेच हत्यार व दारूगोळा बाबत माहिती दिली.सायबर क्राईम बाबत सविस्तर माहीती सांगीतली. विजय झंजाड यांनी विद्यार्थांना कायदा व गुन्हेगारीबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांना पोलीस स्टेशनला चालणारे कामकाज व वाहतुकीचे नियमांबाबत माहीती दिली. वाढत्या सायबर गुन्हया बाबत सविस्तर माहीती सांगीतली. तसेच कादयाविषयी माहीती दिली.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .अश्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात पोलीस रेझिंग डे पोलीस स्टेशनच्या वतीने साजरा करण्यात आला. यासाठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्याचेसह पोलीस नाईक संभाजी शेंडे व कॉन्स्टेबल शशिकांत मस्के व पोलीस कर्मचारी उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment