पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३डिसेंबर२०२४
येथील किरण थोरात व आदित्य थोरात हे आपल्या शेतातून घरी चालले असता या युवकांना कानिफनाथ टेकडी परिसरात वन विभागाच्या समोर लहान मुलांच्या खेळण्याच्या गार्डन येथे विद्युत तारेला चिटकून एक घुबड पक्षी खाली जमिनीवर पडलेला आढळला या पक्षाच्या जवळ गेले असता तो जखमी असल्याने उडून शकल्याने या युवकांनी त्या घुबडास मदत करण्यासाठी घरी घेऊन आले व या युवकांनी इको रेस्क्यू टीम दौंड येथे संपर्क केला असता बुधवारी रात्री उशिरा सायंकाळी जखमी अवस्थेत घुबड आढळून आल्याची माहिती या तरुणांनी इको रेस्क्यू टीम दौंड याना दिली. दौंड पासून १२० किमी अंतर असून देखील टीम शृगी घुबडाला वाचवण्यासाठी आली.
शृगी घुबड हे प्रामुख्याने माळ रान परिसरातील दगडी भागात आढळून येते या ठिकाणी त्याचे अस्तित्व आहे परंतु विजेचा सौम्य धक्का लागल्याने घुबड जखमी होऊन एकाच जागी बसून होते .इको रेस्क्यू टीम ने वनविभाग कर्जत यांच्या मदतीने घुबडास ताब्यात घेतले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता रेस्क्यू टीटीसी पुणे या वन्यप्राणी उपचार केंद्रात दाखल केले.
यावेळी या टीम मध्ये इको रेस्क्यू टीम दौंड चे अध्यक्ष नचिकेत अवधाने ,प्रशांत कौलकर ,गणेश सांगळे सहभागी होते. सहभागी टीमने या शृंगी घुबड पक्षावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आलेल्या प्राणी बचाव व्हॅनमध्ये घेऊन गेले.
भारतीय घुबड (Indian Eagle Owl) आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) लाल यादीत (Red List) “कमी चिंता” (Least Concern) श्रेणीत सूचीबद्ध आहे.IUCN लाल यादी ही वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण स्थितीचे मूल्यांकन करणारी जागतिक यादी आहे. “कमी चिंता” (LC) श्रेणीतील प्रजातींना सध्या विलुप्त होण्याचा धोका नसतो, पण त्यांचे पर्यावरणीय परिस्थितीनुसार भविष्यकालीन मूल्यांकन गरजेचे असते.
No comments:
Post a Comment