पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३डिसेंबर२०२४
जामखेड तालुक्यातील अनेक गावत बिबट्याचा वावर वाढला असून दि१३ रोजी पहाटेच्या ५ वाजेदरम्यान घोडेगाव येथील शेतकरी सतीश बापू भोंडवे यांच्या पाळीव गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचे आढळून आले आहे. याघटनेची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी शेळके यांना कळताच त्यांनी वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पाठवले. मृत गाईच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राठोड केले. वनरक्षक राठोड सपकाळ, तेलंगण वनसेवक ताहेर अली सय्यद यांनी पुढील पंचनामाचे कारवाई केली. तसेच गावातील नागरिकांना आवाहन केले की रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जातात त्यावेळी शेतकऱ्यांनी एकट्याने न जाता तीन-चार जणांच्या जमावाने जाऊन पाणी भरण्याचे काम करावे हातात काठी, बॅटरी, असू द्यावी जेणेकरून बिबट्यापासून संरक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन व मार्केट कमिटीचे संचालक विष्णू भोंडवे, शिवाजी पाचारणे, गणेश निकत, आशिर सय्यद, योगेश गव्हाळे
ग्रामसेवक अनपट भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी दगडू भोंडवे प्रवीण गव्हाळे महेश गव्हाळे दादा पाटील इतर गावातील नागरिक उपस्थित हो
इतर गावातील नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना सांगितले की रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागते त्यामुळे विज महावितरण कडुन काही दिवस दिवसा लाईट देण्याची मागणी करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले की लवकरच महावितरणला पत्र देऊन दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विनंती करणार असून गावातील नागरिकांनी एकटे शेतात जाऊ नये व काही दिवस दक्षता बाळगावी असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment