नेवासा (प्रतिनिधी)दि.३जानेवारी - नेवासा शहरातील शेंडे गल्ली येथे असलेल्या भरावाजवळील एका काटवणात गोवंशी जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने या जनावरांना निर्दयतेने डांबून बांधून ठेवल्याची माहीती नगर येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना एका गुप्त बातमीदारामार्फत मिळाली असता गुरुवार (दि.२) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पंचासह नेवासा येथील घटनास्थळी पोहचून जींवत गोवंशी जनावरांच्या मानेला सुरा लागण्याच्या आतच त्यांची सुटका केल्यामुळे गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईचे नेवासाकरांतून मोठे कौतुक केले जात आहे.
सुमारे १३ लाख ४० हजार रुपये किंमतीचे गोवंशी जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतलेले आरोपी माञ पसार झाले आहेत.याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,गुन्हे शाखेच्या स.पो.नि.थोरात यांना एका खबऱ्याने माहीती दिली की, नेवासा शहरातील शेंडे गल्ली येथील काटवनात इसम नामे नदिम सत्तार चौधरी,फिरोज अन्सार देशमुख,शोएब अलीम खाटिक,खलील उस्मान चौधरी,अबु शाहाबुद्दिन चौधरी,मोजी अबु चौधरी,जबी लतीब चौधरी,अन्सार सत्तार चौधरी,अकिल जाफर चौधरी (सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द) ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर या इसमांनी राज्यात गोवंशी जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतांनाही ही जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने त्यांना निर्दयतने डांबुन बांधून ठेवलेले असून आता येथे आल्यास ही जीवंत जनावरे तुम्हाला मिळून येतील अशी पक्की बातमी पोलीसांना मिळाली त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली स.पो.नि. हेमंत थोरात,स.फौ.दत्तात्रय हिंगडे,पो.हे.काॅ विश्वास बेरड,पो.हे.कॉ. बापुसाहेब फोलाणे,पो.हे.कॉ.गणेश भिंगारदे,पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर शिंदे,पो.ना.सोमनाथ झांबरे,पो.कॉ.किशोर शिरसाठ, पो.कॉ.रविंद्र घुंगासे,पो.कॉ.रमीजराजा आतार, पो.कॉ.रोहित यमुल,पो.कॉ.बाळासाहेब गुंजाळ, पो.कॉ.बाळासाहेब खेडकर,पो.कॉ रोहित मिसाळ, पो.कॉ.शिवाजी ढाकणे,पो.हे.कॉ.संतोष शंकर लोढे, चालक पो.हे.कॉ.चंद्रकांत कुसळकर,चालक पो.कॉ. अरुण मोरे या गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नेवासा बसस्थानक येथून पंचासह घटनास्थळी दाखल झाले असता आपल्याकडे पोलीस ताफा येत असल्याचे लांबूनच बघून गोवंशी जनावरे डांबून ठेवलेल्या इसमांनी घटनास्थळावरुन पोलीस पाहताच चांगलीच धुम ठोकली त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पळून गेलेल्या इसमांची बाजूबाजुला चौकशी करुन त्यांची नांव - गांवे विचारल्यावरुन त्यांच्यावर गुन्हे शाखेचे पो.कॉ.संदिप दरंदले (वय ३५) नेमणूक गुन्हे शाखा नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून निर्दयतेने गोवंशी जनावरे डांबून ठेवलेली
जिवंत गोवंशीय जनावरे जीवंत ताब्यात घेण्यात आलेली असून त्यांची वर्णन खालील प्रमाणे १) १०,२०,०००, २) २,४०,००० = ०० रुपये किंमतीचे १७ गोटे गोवंशीय जनावरे काळे, पाढरे, ताबडया रंगाच्या गायी प्रत्येकी अंदाजे किंमत ६०,०००/- रुपये प्रमाणे =०० रुपये किंमतीचे ०६ गोवंशीय कालवड काळे पांढरे ताबड्या रंगाच्या प्रत्येकी अंदाजे किंमत ४०,०००/- रुपये दराप्रमाणे किंमत अंदाजे ३) ८०,००० = ०० रुपये किंमतीचे ४ गोवंशीय काळे पांढरे ताबडे रंगाचे गोऱ्हे प्रत्येकी किंमत २०००० रुपये किंमत अंदाजे असे एकूण १३,४०,००० = ०० जीवंत मुद्देमाल गुन्हे शाखेचे पोलीसांनी यशस्वी छापा टाकून पकडल्यामुळे नेवासकरांतून गुन्हे शाखेच्या पोलीसांवर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
No comments:
Post a Comment