पोलीस वारंट न्यूज नेटवर्क३ जानेवारी२०२५
पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून 02 जानेवारी ते 08 जानेवारी 2025 दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे.जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दि ३ जानेवारी रोजी पोलीस रेंजिंग डे सप्ताहच्या अनुषंगाने आज दि३ जानेवारी २०२५ रोजी जामखेड ल.ना.होशिंग विद्यालयात संपन्न झाला दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने रेझिंग डे साजरा केला जात आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२४ तास ऑन ड्यूटी असणा-या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, माहिती व्हावी, यासाठी ‘जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेड ल.ना होशिंग विद्यालय येथे ’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दि.३ जानेवारी रोजी जामखेड येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पोलिस खात्याच्या कामकाजाविषयी माहिती दिली आहे. तसेच वाढत्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती सांगितली कायद्याविषयी माहिती दिली मुलींना काही अडचण असेल तर त्यांना डायल 112 बाबत माहिती दिली आहे त्याचबरोबर पोलिसांकडील शस्त्रसाठ्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले .विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत माहीती दिली. कायदया विषयी माहीती सांगीतली तसेच हत्यार व दारूगोळा बाबत माहिती दिली. यावेळी मुलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्नांची उत्तरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिले. विद्यार्थांना कायदा व गुन्हेगारीबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांना पोलीस स्टेशनला चालणारे कामकाज व वाहतुकीचे नियमांबाबत माहीती दिली. वाहतूक नियमांचे पालन कसे करावे व ते नाही केले तर कायदेशीर कारवाई काय आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली.या कार्यक्रमासाठी 250 ते 300 विद्यार्थी हजर होते.अश्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात पोलीस रेझिंग डे पोलीस स्टेशनच्या वतीने साजरा करण्यात आला. यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याचेसह पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे,प्रकाश जाधव, अविनाश ढेरे यांनी विद्यार्थ्यांना शस्त्राबाबत माहिती दिली यावेळी ल.ना.होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.ए.पारखे,उपमुख्याध्यापक गायकवाड, पर्यवेक्षक राजमाने, एनसीसी प्रमुख देडे सर, राऊत सर तसेच शिक्षक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment