श्वेता गायकवाड
--------------------------------------------------------
दि.१५ जानेवारी२०२५
नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस दप्तरी दाखल असलेल्या चोऱ्यांच्या गुन्ह्याचा तपास करुन चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी नेवासकरांनी पोलीसांना २६ जानेवारीपर्यंतची अंतिम अखेरी मुदत दिलेली आहे जर पोलीसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करुन चोरटे जेरबंद केले नाहीतर भारतीय प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यासमोर नेवासकर आता स्वता:चे तोंड काळे करुन घेणार असल्याचे लेखी निवेदन पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांना देवून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यामुळे आता नेवासा पोलीसांना 'बाप दाखव अन्यथा श्रद्धा घाल' ही भूमिका साकारावी लागणार आहे त्यामुळे नेवासा पोलीस झालेल्या चोऱ्यांचा तपास लावणार? की, नेवासकर आंदोलन करणार याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे.
नेवासा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेञात पोलीस दप्तरी दाखल असलेल्या वाहन चोऱ्या,घरफोड्या आणि वेगवेगळ्या दाखल गुन्हांचा तपास पोलीसांनी करण्याची मागणी नेवासकरांनी करुन जर पोलीसांनी चोरटे पकडल्यास पोलीसांचा जाहिर सन्मान करुन ११ हजार रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आलेले आहे तर मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना निपुंगे व ग्रामस्थांकडून महीलांच्या अंगावरील मौल्यवान सोन्या - चांदीच्या दागिन्यांच्या झालेल्या चोऱ्यांचा तपास पोलीसांनी केल्यास मुकिंदपूर ग्रामस्थांच्यावतीनेही नेवासा पोलीसांना ११ हजार रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आलेले आहे पोलीसांना चोऱ्यांचा तपास लावण्यासाठी ग्रामस्थांनी बक्षिस जाहिर केलेले आहे जर पोलीसांनी तपास लावला नाही तर नेवासकर आता स्वता:चेच तोंड नेवासा पोलीस ठाण्यासमोर काळे करुन घेण्याचे अनोखे आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन संजय सुखधान यांनी ग्रामस्थांच्यावतीने पोलीसांना दिलेले आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी नेवासा पोलीसांची ढासाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यास भाग पाडण्याची नितांत गरज आहे अन्यथा पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांची पोलीस मुख्यालयात बदली करुन नेवासकरांची पोलीसांबद्दलची नाराजी दुर करण्याची मागणी आंगोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment