(दि.१६ ): जामखेड येथील दैनिक महाराष्ट्र सुर्योदय चे जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज भगतसिंग पवार यांची दैनिक महाराष्ट्र सुर्योदय च्या उपसंपादक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
धनराज पवार यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या चार वर्षांपासून काम करत महत्त्वपूर्ण अनुभव मिळवला आहे. त्यांनी यापूर्वी जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.त्यांची लेखन शैली,महत्त्वपूर्ण लेख व विविध स्तरातील बातम्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.आपल्या कर्तृत्वाने आणि कौशल्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या या निवडीमुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचे नाव उंचावले गेले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment