पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२९जानेवारी२०२५
आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढतच आहे .अशातच जुन्या तहसील कार्यालयासमोर मोटार सायकल चोरी गेल्याची घटना समोर आली आहे .
यातील फिर्यादी सूर्यकांत किसन सदाफुल (वय ३९ वर्ष) रा.जामखेड ता.जामखेड जि. आहिल्यानगर यांची 15,000 रु.किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH-16 AW-5986 ही जुन्या तहसील कार्यालय जामखेड येथे लावुन मी माझे खाजगी काम करण्यासाठी नवीन तहसील कार्यालय येथे गेलो असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता लबाडीच्या इराद्याने जामखेड जुन्या तहसील कार्यालयाच्या समोरून चोरून नेली आहे. ही घटना दि. 27 जानेवारी2025 रोजी दुपारी 1:30 ते 3 वाजताच्या दरम्यान घडली असून दि. 28 जानेवारी 2025 रोजी जामखेड पोलीस स्टेशनला गु.र.क्र 48/2025 बीएनएस 2023 चे कलम 305( ब) प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस नाईक वाघ करत आहेत.
No comments:
Post a Comment