बार्शी प्रतिनधी/१६ मार्च२०२५
श्रीलंका ते भारत 30 किलोमीटर जलतरण पोहण्याची स्पर्धा दिनांक 9 व 10 एप्रिल रोजी होणार असून यासाठी बार्शी जिल्हा सोलापूर येथील फ्लिफर्स स्विमिंग क्लबच्या 10 जलतरणपटूंनी सलग 12 तास पोहण्याचा सराव केला आहे.श्री शिवाजी महाविद्यालय येथील प्रांगणात असलेल्या कर्मयोगी जलतरण तलावातील बारा तासांच्या सरावा मुळे आम्ही या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत या लहान मुलांनी दिले आहेत.बार्शी येथील 10 लहान वयोगटातील जलतरणपटू हे (श्रीलंका) येथील तलाईमुनार ते धनुषकोडी तमिळनाडू (भारत) पर्यंत सलग 30 किलोमीटर समुद्रातून पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना होणार आहेत.
या स्पर्धेला दहा स्पर्धकांना 12 लाख 50 हजार रुपये खर्च येणार आहे. याबाबत बार्शीचे आमदार दिलीपजी सोपल साहेब यांनी एक लाख 25 हजार रुपये तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख रुपये खर्चासाठी प्रोत्साहन म्हणून या जलतरणपटूंना दिले आहेत.
समाजमना मध्ये राजकीय,सामाजिक व उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या दानशूर व्यक्तींनी बार्शी सारख्या ग्रामीण भागातील जलतरणपटूंना प्रोत्साहन म्हणून होणाऱ्या खर्चासाठी आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर प्रदीप नवले 8652149090 या मोबाईल नंबर संपर्क साधावा.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, तमिळनाडू, आणि भारत सरकार सह श्रीलंका शासनाची परवानगी व अधिकृत मान्यता मिळाली असल्याची माहिती जलतरण प्रशिक्षक बाळराजे पिंगळे व प्रदीप नवले यांनी यावेळी बोलताना दिली.
तलाईमुनार ते धनुषकोडी या 30 किलोमीटरच्या जलतरण स्पर्धेसाठी सलग सुमारे दहा तासांचा अवधी अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी जलतरण तलावात गुरुवारी दि.13 रोजी रात्री 1 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सलग 12 तास पोहण्याचा यशस्वी सराव घेण्यात आला होता व सर्वांनी तो पूर्ण केला, त्यामुळे या स्पर्धेत भाग घेतलेला चिमुकल्या जलतरणपटूंचा उत्साह व आनंद द्विगुणीत झाला होता.
चौकट
श्रीलंका ते भारत जलतरण स्पर्धेसाठी सर्वात कमी 9 वर्षे वयाच्या तन्वी नवले, स्निग्धा जगताप यांचा समावेश आहे. तर शौर्य नवले, शुभ्रा कडगंची, भार्गवी मुळे, माधव शिंदे, जयसिंह शिंदे, स्वराज डोईफोडे, रुद्र नवले, आणि रणवीर सातपुते हे पंधरा वर्षाखालील दहा स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा