खर्डा प्रतिनधी/१६ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव येथील सुपुत्र
समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वृद्धांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली, ज्यामुळे त्यांना आवश्यक ती आरोग्य सेवा पोहोचवण्यात आली. निलेश भाऊंनी कोरोना काळातही समाजातील गरजू व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मदत केली होती, ज्यामुळे त्यांच्या समाजसेवेची प्रतिष्ठा जामखेड तालुक्यात आणखी वाढली आहे.
आज दिनांक 16 मार्च रोजी नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉक्टर बिपिनचंद्र लाड यांनी वृद्धांची आरोग्य तपासणी केली आणि त्यांना आवश्यक औषधोपचार दिले. सर्व उपस्थितांना अल्पोहार जेवण देण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण अधिक आनंददायी झाले.
निलेश भाऊंनी कोरोना काळात अनेक गरजू व्यक्तींना औषध, किराणा आणि भाजीपाल्याची मदत केली होती. त्यांनी दुष्काळात पाणी वाटप आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदत करण्याचे कामही केले होते. हे सर्व कार्य त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेने प्रेरित आहे .या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार दत्तराज पवार मित्र मंडळ खर्डा यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी दत्तराज पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील साळुंखे, बापू ढगे, बाला भैसडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर निलेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
चौकट
जामखेड तालुक्यातून सोशल मीडियावरून निलेश भाऊ गायवळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांची लोकप्रियता आणि समाजसेवेची प्रतिष्ठा यामुळे अधिकच वाढली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा