जामखेड प्रतिनधी/१६ मार्च 2025
जामखेड पोलीस स्टेशनमध्ये दि.3 सप्टेंबर 2021 रोजी फिर्यादी-माधव सदाशिव लोहकरे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी नामे1)दादासाहेब चंद्रभान लोहकरे,2) शांतीलाल मुरलीधर लोहकरे3) गोवर्धन त्रिंबक लोहकरे4) सुनिल बन्सी लोहकरे5) रामहरी चंद्रभान लोहकरे6) चंद्रभान देवराव लोहकरे राहणार लोहकरे वस्ती पांढरेवाडी ता. जामखेड याचेविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. ही घटना जामखेड येथे घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहीती नुसार सदर आरोपींवर भारतीय दंड संहिता (भा.दं.वि.) कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे तपासी पोलीस हवालदार संभाजी शेंडे यांनी घटनेचा तपास केला आहे .दि १५ मार्च २०२५ रोजी सदर केसचा निकाल लागला असून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी वरील नमूद आरोपींना प्रत्येकी 300 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींना दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून ही शिक्षा आरोपींच्या कृतींच्या गंभीरतेचा पुरावा आहे. पोलीस हवालदार संभाजी शेंडे यांनी या प्रकरणाचा तपास केला असून पोलीस कॉन्स्टेबल शशी म्हस्के यांनी मदत केली आहे आणि आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
नेमके प्रकरण काय होते हकिकत थोडक्यात खालीलप्रमाणे -
सदर घटना, दिनांक ०३.०९.२०२१ रोजी, दुपारी ०४:०० वाजेच्या सुमारास मौजे पांढरेवाडी, ता. जामखेड येथे फिर्यादी माधव सदाशिव लोहकरे यांच्या शेतात घडल्याबाबतची आहे. घटनेवेळी पांढरेवाडी ते लोहकरेवस्ती असा रस्ता पावसाने वाहुन गेल्याने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे काम चालू असतांना सदर जेसीबी त्याच्या शेताजवळ आल्यानंतर त्याठिकाणी खबर देणार, त्याची पत्नी आशाबाई व आई रुक्मीणी असे गेले असता तेथे सर्व आरोपी हजर होते. त्यावेळी, खबर देणार हा त्यांना "बांधाचे कडेला उखरू नका, चारी उखरून रस्त्यावर टाका", असे म्हणाला. त्यावेळी, वरील नुमद आरोपी क्र.१ व ५ यांनी जेसीबी चालकास, "हा बांध रस्त्यावर उखरून टाका, आमचे शेत बांधाचे पलीकडे पर्यंत आहे", असे म्हणुन शिवीगाळ करून, आरोपी क्र.५ याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी, आरोपी क्र.१ याने त्याच्या हातातील काठीने खबर देणारच्या पाठीत व पायावर मारहाण केली व आरोपी क्र.२ याने काठीने खबर देणारच्या नाकावर मारून त्याला जखमी केले. तसेच, आरोपी क्र.३ याने हातात दगड घेवुन त्याच्या पाठीत मारला व आरोपी क्र. ४ ते ६ यांनी त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर, खबर देणार यांनी पोलीस ठाणे, जामखेड पोलीस स्टेशनला आरोपींविरूध्द फिर्याद दिली होती.
सदरच्या फिर्यादवरून आरोपींविरुध्द भा.दं.वि.चे कलम १४३, १४७, ३२४, ३२३, ५०४ व ५०६ सह-कलम १४९ अन्वये गुन्हा क्र. ।-४०९/२०२१ नोंदविण्यात आला. प्रस्तुत गुन्ह्याचा पुढिल तपास तपासीक अंमलदार पो.ना. . एस.व्ही. शेंडे, ब.नं. १४८८ यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान तपासीक अमंलदारने आरोपींना अटक केली होती वैद्यकिय अहवाल प्राप्त केला, साक्षीदारांचे बयाण नोंदविले व तपासाअंती आरोपींविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा