जामखेड प्रतिनधी/२२ मार्च२०२५
आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर आणि तालुक्यातील खर्डा सह आसपासच्या पान टपऱ्यांभोवती तरुणांची गर्दी वाढत आहे. गुटखा बंदीच्या नंतर तरुणाई आता पानाच्या नशेकडे खेचली जात आहे, आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या नशायुक्त घटकांमुळे आरोग्यावर होणारे परिणाम चिंताजनक आहेत. ही बाब समाजात आणि तरुणांच्या आरोग्यावर संकटकालीन बनत आहे, त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
जामखेड शहर व आसपासच्या गावांमध्ये पारंपरिक पानांची पद्धत बदलून आता आधुनिक आणि नशायुक्त प्रकार वापरले जात आहेत. पूर्वी पानांमध्ये चुना, सुपारी, कात घातले जायचे, आता रिमझिम पावडर, फुलचंद पानात काळी सल्ली, रिमझिम पावडर सारखे घटक वापरले जात आहेत. गुटखा बंदीनंतर तंबाखू आणि सुगंधी सुपारीच्या पुड्या एकत्र करून खाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यामुळे तरूणाई व्यसानाच्या आहारी जात आहे
पानांमध्ये वापरल्या जाणार्या तंबाखू, मावा, सुगंधी किमाम, रिमझिम पावडर सारखे घटक आरोग्यासाठी घातक आहेत. या नशायुक्त पानांचे सेवन जामखेड तालुक्यासह खर्ड्यात तरुणाई खूप प्रमाणात करत असल्याने समाजातील तरुण पिढीवर हे परिणाम होत आहे. पान टपऱ्यांवर तरुणांची ये-जा सहा ते आठ वेळा होत असल्याने प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा