स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५६,००० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी जामखेड तालुक्यातील बसरवाडी शिऊर येथे ७० वर्षीय काशीबाई सुर्वे व त्यांचे पती यांच्यावर तीन अनोळखी इसमांनी दरोडा टाकला होता.
फिर्यादी व त्यांचे पतीस मारहाण करून त्यांचेकडील सोन्याचे दागीने जबरीन चोरून नेले.याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.58/2025 बीएनएस कलम 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या घटनेची तक्रार जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
सदर घटनेच्या तपासकामी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी विशेष पथक नेमले होते या पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे दि २३ मार्च रोजी २०२५ रोजी जामखेड येथील नवले पेट्रोलपंपावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून अटक करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी - १) मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) आणि २) किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०). दोघेही कासारी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत.
आरोपींची पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत मुन्ना भोसलेकडून 7 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (किंमत 56,000 रुपये) जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी घटनेत सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, त्यांचे फरार साथीदार मोहन निकाळजे भोसले यासह त्यांनी एक महिन्यापूर्वी वृद्धांच्या घरावर हल्ला केला होता.
ताब्यातील आरोपींना जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू असून सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा