यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीच्या कामासाठी सार्वजनिक रस्ते पथदिवे गटार या सोयी सुविधांसाठी शासन दरबारी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी मदारी समाजाला जागा, घरे, मिळावी यासाठी गेली 15 वर्षापासून शासन दरबारी मोर्चे, आंदोलन, उपोषणे, बैठका घेऊन हा मदारी समाज या ठिकाणी कशाप्रकारे वास्तव्यास करत आहे, खर्डा येथील भाजीपाला बाजारात पाल ठोकून राहत आहे ज्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी हे पाल काढून घ्यायचे आणि बाजार संपल्यानंतर परत त्या जागेवरती पाल टाकायचे त्यांना राहण्यासाठी घर नाही जागा नाही विज नाही स्वच्छता स्वच्छ पाणी नाही ही सर्व ह्या लोकांचे खरे वास्तव्य शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करून 2024 मध्ये शासनाने या लोकांना घरे व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीला मान्यता देऊन या कामासाठी 64,1023 रुपये मंजूर केले, त्यानुसार या कामाची निविदा 1/3/ 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सदर ही निविदा शंभुराजे कन्ट्रक्शन या संस्थेने 31 टक्के कमी दराने भरली गेली,परंतु या संस्थेने शासनाच्या कोणत्याही नियमाचे पालन केले नाही स्वतः मनमानी पद्धतीने वागत गेली, निविदा कमी दराने भरल्यामुळे त्यासाठी शासनाकडे अंदाजे 11 लाख रुपये भरणा करावा लागत होता तो देखील केला नाही, त्यामुळे या वसाहतीचे काम वेळेत पूर्ण झाले नाही,
मागील 15 दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शंभूराजे कंट्रक्शन मदारी वसाहतीचे काम घेऊन ते काम वेळेत पूर्ण केले नाही म्हणून या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे याकरीता पंचायत समिती जामखेड या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते, कारण हा मदारी समाज अनेक दिवसापासून उघड्यावर राहत होता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर त्यांच्या घरांमध्ये आनंदाच्या दिवाळीचा दिवा लागणार होता, परंतु काही बेजबाबदार संस्थांमुळे या लोकांना आणखीन पण उघड्यावरच संसार थाटावा लागत आहे, हे पाप तरी तुम्ही कोठे फेडणार आहात, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शुभम जाधव पंचायत समिती जामखेड यांनी शंभुराजे कंट्रक्शन यांना कारणे दाखवा नोटीस काढून हे काम का केले नाही व या कामाला विलंब का लावला याचा लेखी खुलासा दोन दिवसात मागविला आहे अन्यथा शंभूराजे कंट्रक्शन ही संस्था काळ्या यादीत टाकण्यात येईल असे सदर पत्राद्वारे शंभूराजे कंट्रक्शनला कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा