खर्डा प्रतिनिधी/८मार्च२०२५
आज दिनांक ८ मार्च रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके मुक्त संसाधन केंद्र या संस्थेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष खर्डा गावचे सरपंच संजीवनी ताई पाटील म्हणाल्या की ग्रामीण विकास केंद्र ही संस्था महिलांना सतत न्याय सन्मान मिळवून देत आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रियंका ताई गोलेकर म्हणाल्या की कुठल्याही महिलेने स्वतःला कमी समजू नये आपण सर्व आपल्या देशाच्या नागरिक आहोत आपल्या पाठीशी सावित्रीबाई फुले व भारतीय संविधान आहे तसेच सा नीता पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच तसेच मंजुषा लाड यांनी शुभेच्छा दिल्या तसेच मीना शेळके यांनीही शुभेच्छा दिल्या पुष्पा मोरे यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच शाहीर बाबासाहेब राजगुरू यांनी महिला दिनावर सावित्री फातिमा यांच्यावर गीत गायले तसेच त्यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त खूप सुंदर रांगोळी काढली तसेच नीता इंगळे यांनी प्रस्तावना केली तसेच विशाल भाऊ पवार यांनी प्रस्ताविका केली तसेच उर्मिला कवडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर बीपीचन लाड यांनी मानले या कार्यक्रमासाठी उपस्थित शोभाताई ठोकळे ,सुवर्णाताई पवार, आस्मा आत्तार ,रुकसाना मापाडी, जिजाबाई काळे, शांताबाई पवार, जिजाबाई पवार, ललिता काळे ,चंद्रकला काळे, राणी खटावकर ,पार्वती पवार, शारदा काळे, सखु पवार, चंद्रकला पवार ,ज्योती पवार ,ज्योती माळी ,विमल काळ ,भाग्यश्री माळी, राधाबाई पवार इत्यादी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा