महाराष्ट्रातील महिला सुरक्षा पुन्हा एकदा प्रश्नांकित झाली आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना ताजी असतानाच याच दरम्यान, बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला दिनाच्या दिवशीच एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही दोन्ही प्रकरणे महाराष्ट्रातील महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकत आहेत.
या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार उद्धव गडकर याने महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले आणि पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही बसने महिला पुण्याहून बीडला येत होती. तिला बसमधून उतवरुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती ठाणे अमलदार उद्धव गडकर याच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाणघेवाण झाली. संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर अत्याचार सुरु ठेवले.
फिर्यादी महिलेने ही घटना काल दि 8 मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास घडल्याचे पोलिसांना सांगितले. पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन महिलेने पोलीस निरीक्षक यांच्या समोर तक्रार दाखल केली. कारवाईला सुरुवात होईपर्यंत ती पोलीस ठाण्यात बसून होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच अमलदार उद्धव गडकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
चौकट
या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. या घटनांमुळे समाजातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जनतेचे रक्षकच भक्षक बनत असतील तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा